पश्चिम महाराष्ट्र पुणे विभागीय अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या अध्यक्षपदी ह.भ.प.आनंद महाराज तांबे यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

मोरया गणपती चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत अष्टविनायक पैकी श्रीक्षेत्र थेऊर, श्रीक्षेत्रमोरगाव, श्रीक्षेत्र सिध्दटेक, चिंचवड व नारंगी गणपतीचे व्यवस्थापन कायदा आणि सुव्यवस्था यांचे चोख पालन करुन भाविकांना चांगली व्यवस्था करुण देणे, अडीअडचणी सोडविणे अशा प्रकारचे उत्तम व जबाबदारीने काम करणारे तसेच आई वडिलांच्या चांगल्या संस्काराने, “कर्तृत्व – नेतृत्व – वकृत्वाचा” त्रिवेणी संगम असणारे अध्यात्मिक क्षेत्रात वैचारिक वारसा लाभलेले
किर्तनकार ह.भ.प.आनंद महाराज तांबे यांची पुणे विभागीय अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने हा हवेली तालुक्याचा खूप मोठा अभिमान आहे ते निश्चितच मिळालेल्या संधीचे सोन करतील असा विश्वास हवेली तालुका पत्रकार संघाचे सचिव अमोल भोसले यांनी दिला. याप्रसंगी पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर यांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष हभप आनंद महाराज तांबे यांचा सन्मान शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देवुन करण्यात आला.

याप्रसंगी सामाजिक आश्वीन मुन, महिला पोलीस मित्र संघाच्या अध्यक्षा कविता टेळे, उपाध्यक्षा आरती मुन, सचिव प्रशांती साळवे, कार्यध्याक्षा प्रियांका जाधव, संपर्कप्रमुख मनिषा कुंभार, सांस्कृतिक विभाग प्रमुख मोना ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक प्रा.सुरेश वाळेकर यांनी केले आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सामाजिक विधायक उपक्रमाची थोडक्यात माहिती सांगितली तसेच भविष्यात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रम संदर्भात रुपरेषा सांगितली. सत्काराला उत्तर देताना हभप आनंद महाराज तांबे यांनी सांगितले की सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीला तुमच्या सर्वाच्या आशिर्वादाने खूप मोठी जबाबदारी मिळाली आहे निश्चितच आपण सर्व मिळुन चांगले काम करु हे ऋणानुबंध असेच ठेवु या. तर कार्यक्रमाचे आभार मोना ननवरे यांनी मानले.

Previous articleह.भ.प. माणिक(आबा) रामभाऊ कासुर्डी यांची अखिल भारतीय वारकरी मंडळ सप्ताह व दिंडी कमिटी दौंड तालुका उपप्रमुखपदी निवड
Next articleनाणेकरवाडीमध्ये कोरोनाचे महानिदान शिबीर