पाटस येथे कोविड सेंटर चे रमेश थोरात यांच्या हस्ते उद्घाटन

दौंड,आवाज जनतेचा आँनलाईन

दौंड तालुक्यातील पाटस या गावातील नागेश्वर विद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे . या कोविड सेंटर चे उद्घाटन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले . या कोविड सेंटर चा फायदा पाटस गावातील नागरिकांना होणार आहे .

दौंड तालुक्यातील पाटस या गावात कोविड सेंटर सुरू करण्यास दौंड – पुरंदर चे उपविभागीय अधिकारी यांनी मंजुरी दिली . यानुसार पाटस गावातील नागेश्वर विद्यालयात आज कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे . या कोविड सेंटर साठी नऊ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून या कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करून देण्यात आले आहे.

या कोविड सेंटरला 50 बेड ची मान्यता देण्यात आली आहे . विद्यालयाच्या वर्ग खोल्यांमध्ये रुग्णांसाठी कॉट टाकण्यात आल्या आहेत . या कोविड सेंटर मध्ये रुग्णांना आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे . तसेच प्रत्येक रुम मध्ये रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक किटली ठेवण्यात येणार आहे . तसेच कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना वाफ घेण्यासाठी प्रत्येक रुम मध्ये एक वाफेचे मशीन ठेवण्यात येणार आहे . महसूल विभागाच्या वतीने रुग्णांची जेवणाची सोय करण्यात येणार आहे .

या कोविड सेंटर साठी वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराणी पांचाळ , पाटस आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधीकारी डॉ . रुपाली भागवत , केडगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ . संतोष टेकवडे आरोग्य सेविका नीता वणवे , आरोग्य सहाय्यीका रुपाली चितारे ,आणि वार्ड बॉय सचिन जराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

कोविड सेंटर मध्ये रुग्णांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात , जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सभापती सारिका पानसरे ,दौंड पंचायत समिती सभापती आशा शितोळे यांनी केली .

यावेळी पाटस चे मंडल अधिकारी राजेंद्र म्हस्के , तलाठी शंकर दिवेकर , ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे आरोग्य सेवक भीमराव बडे तसेच सत्वशील शितोळे , शिवाजी ढमाले , राजेंद्र पानसरे , नितीन शितोळे ,संपत भागवत , अनिल शितोळे पाटील , प्रमोद कुरुंद ,विश्वास अवचट , संजय शिंदे यांसह आरोग्य विभाग आणि पाटस ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते .

Previous articleनारायणगाव येथे घरोघरी जाऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी केली नागरिकांची तपासणी
Next articleसोरतापवाडी येथील कोरोनाने त्रासलेल्या माऊली’ची १३ दिवसांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी