सोरतापवाडी येथील कोरोनाने त्रासलेल्या माऊली’ची १३ दिवसांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

उरुळी कांचन , अमोल भोसले

आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक विजय गोंविदराव चोरघे यांच्या कुटुंबाला कोरोणाची लागन झाली. त्यामधे प्रथम त्यांचा भावाला व वहिनीला कोरोनाची लागन झाली. नंतर विजय चोरघे आणि त्यांची आई यांची चाचणी केली.

चाचणीत विजय चोरघे यांचा रिपोर्ट पाॅझिटिव आला. व त्यांचा आईचा रिपोर्ट त्यावेळी निगेटिव आला. त्या वेळी सगळ्यांना बर इतकच वाटल की आईचा रिपोर्ट निगेटिव आला. सगळे बिनधास्त राहिले. आणि काळ सोकवला नको तेच झाल. ४ दिवसांनी अचानक आई इंदुबाई यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. घरातील २ मुले सुन पाॅझीटीव असताना..अशा वेळी आईला पुढील उपचारासाठी हाॅस्पिटल मध्ये दाखल कोण करणार? याचा पेच समोर असताना.. यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष सनी चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वता पुढे येऊन पुढील उपचारासाठी विश्वराज हाॅस्पिटल या ठिकाणी हलवले..परंतु उपचारासाठी बेड मिळत नसल्याचे समजताच सनी चौधरी यांनी तात्काळ आमदार अशोक पवार यांना फोन करुन सविस्तर माहिती दिली.

आमदार यांनी फोनवर सांगितले की तु काही काळजी करु नको मी बेडची व्यवस्था करतो.. आमदार पवार यांचा तात्काळ विश्वराज हाॅस्पिटलचे प्रमुख डाॅ. देशमुख यांच्याशी संपर्क करुन आय.सी.यु मध्ये बेडची व्यवस्था करुन दिली..नंतर आमदार पवार यांनी दररोज डाॅक्टरांना संपर्क करुन चौकशी करत उपचारावर्ती काळजी पुर्वक लक्ष देत होते.. आणि गेले १३ दिवस सनी चौधरी हे स्वताच्या आई प्रमाणे चोरघे कुटुंब अडचणीत असताना श्रीमती इंदुबाई गोविंद चोरघे यांची हाॅस्पिटल मध्ये सेवा करत होता.. प्रत्येक गोष्ट हाॅस्पिटला हव ते दिवसाची रात्र करुन सनी चौधरी ने आमदार पवार यांच्या मदतीने पुरवली.. या कोरोनाचा महाभयंकर आजाराने त्रासलेल्या इंदुबाई चोरघे यांनी १३ दिवस मृत्युशी झुंज देत असताना अखेर या माऊलीने सोमवार दि ७ /९ २०२० रोजी दु १. ३० मि. अखेरचा श्वास घेतला…

पण आपल्या कट्टर समर्थकाच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचा आईसाठी आमदार अशोक पवार आणि सनी चौधरी शेवटपर्यंत लढत असताना मात्र सोरतापवाडीतील लोकांच्या मनात घर करुन गेले.दुसर्यांसाठी जगता जगता तु पंढरीची माऊली होऊन गेलीस पण आज मात्र खर सांगतो तु लाखात एक आई होऊन गेलीस.
कोरोनाच्या महामारीमुळे सर्व सामान्य माणसाच्या मनात भिती निर्माण झाली आहे समाजातील तरुणांनी एकत्र येऊन त्यांना आधार देण्याची अत्यंत गरज आहे.

Previous articleपाटस येथे कोविड सेंटर चे रमेश थोरात यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleमराठी पत्रकार परिषदेचा ‘रायगडाचा शिलेदार’ निखळला. पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे आकस्मित निधन