हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी श्रीकांत पाटोळे यांची निवड

Ad 1

गणेश सातव, वाघोली

हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी केसनंद येथील युवा कार्यकर्ते श्रीकांत सुभाष पाटोळे यांची निवड करण्यात आली आहे.नुकतेचं हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शयोगेश शितोळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी शिरुर- हवेलीचे आमदार अँड.अशोकबापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जोगेश्वरी मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करुन मास्क वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,युवक उपाध्यक्ष मंगेश सातव, अल्पसंख्याक सेलचे हसन भाई शेख,महिला आघाडी उपाध्यक्ष शोभा हरगुडे,कविता शेळके लिलाबाई हरगुडे,झाड फाऊंडेशनचे दत्ताआबा हरगुडे,बहुजन सेवा समितीचे किशोर भोंडे शिवाजीराव पाटोळे तंटामुक्तीचे राजेंद्र सावंत कामगार युनियन अध्यक्ष सतीश ढवळे,अजित जाधव,विठ्ठल हरगुडे,विपुल गायकवाड,जयदीप गायकवाड,शुभम गायकवाड, विशाल वाव्हळ,भरत चव्हाण निशिकांत पाटोळे,योगेश पाटोळे,अक्षय गायकवाड, ऋषिकेश चव्हाण,महेश झाडके तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.