राजगुरूनगर येथे महिला शक्ति कार्यालयाचे उद्घाटन

Ad 1

राजगुरूनगर-महिला शक्ति ट्रस्ट दिल्ली व्दारा आयोजित महिला शक्ति खेड तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण दादा आहेर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजगुरुनगर शहर अध्यक्ष सुभाषशेठ होले यांच्या हस्ते झाले.


यावेळी महिला शक्ति खेड तालुका अध्यक्ष नितीन गुरव, राजगुरुनगर शहर अध्यक्ष मनिषा सांडभोर, तालुका संपर्क प्रमुख महेंद्र काळे, तुषार सातकर, तालुका महिला सल्लागार मनिषा टाकळकर पवळे, रूपाली गुरव उपस्थित होते.

तालुका अध्यक्ष नितीन गुरव म्हणाले निराधार व विधवा महिलांसाठी मासिक पेन्शन सुरू करणे, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सवलत, त्यांच्या समस्या सोडविणे आदी सेवा भावी उपक्रम या कार्यालयाच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत.यावेळी सौ.अलका जोगदंड, सौ.घनवट,सौ.आंद्रे आदी महिला व पदाधिकारी उपस्थित होते