युवा धोरणाची‌ अंमलबजावणी करण्याची प्रविण मोरे यांची मागणी

अमोल भोसले , उरुळी कांचन 

 “महाराष्ट्र राज्याने २०१२ साली राज्य युवा  धोरण मंजूर केलेले आहे .त्यानुसार युवा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने  महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी ,” असे निवेदन भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे पुणे उपाध्यक्ष प्रवीण मोरे यांनी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे पुणे  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गृह शाखेच्या तहसीलदार आखाडे मॅडम यांना दिले.

  यावेळी प्रवीण मोरे यांनी युवकांच्या विकासासाठी महत्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर भर देताना सांगितले ,राज्य युवा धोरणानुसार  प्रत्येक जिल्हा स्तर आणि तालुका स्तरावर युवक प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. याबरोबरच युवकांना मराठी साहित्याची गोडी लागावी तसेच युवकांकडून दर्जेदार मराठी साहित्य निर्मिती व्हावी यासाठी, अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य युवा साहित्य संमेलन भरविण्यात यावे.

युवकांना एकत्रित करून युवकांतर्फे तालुका स्तरावर सामाजिक कार्यासाठी युवक मित्र यांची नेमणूक करावी आणि राज्य-राज्यातील  युवकांच्या विचारांची आणि संस्कृतीची  देवाण घेवाण होण्यासाठी विद्यापीठ  युवक महोत्सवा च्या धर्तीवर, राज्य युवा आदान-प्रदान  महोत्सव भरविण्यात यावा ,अशा अनेक मुद्यांच्या मागणीचे निवेदन श्री  प्रवीण मोरे यांनी मुख्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण मंत्री , क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ,आयुक्त ,क्रीडा व युवक सेवा संचालनालय  यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत  दिले.या वेळी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद,पुणे चे अध्यक्ष श्री अमर चिखले, राज्य अध्यक्ष श्री त्रिवेणीकुमार कोरे  यासह  सर्व पदाधिकारी यांनी राज्य युवा धोरण २०१२ अंमलबजावणी साठी पाठपुरावा करण्या साठीचे  प्रयत्न करणार असल्याचे   सांगितले .

Previous articleमांजरवाडी येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक;स्विफ्ट कार सह 1250 ग्रॅम गांजा जप्त
Next articleजुन्नर तालुक्यात आज एकूण ७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले