जुन्नर तालुक्यात आज एकूण ७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात आज ७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण १४८७ रुग्णांपैकी ७८६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

पिंपळवंडी येथे ८, नारायणगाव येथे ७ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून वडगाव आनंद येथे सहा, आळे, राजुरी, ओतूर येथे प्रत्येकी चार, हिवरे बुद्रुक, वडगाव कांदळी, हिवरे तर्फे नारायणगाव, गुंजाळवाडी – आर्वी, निमगाव सावा, धामणखेल, शिरोली बुद्रुक, धालेवाडी येथे प्रत्येकी तीन, वारूळवाडी, गुंजाळवाडी – बेल्हे, उंब्रज नं. १, मढ, निरगुडे येथे प्रत्येकी दोन तसेच आर्वी, बोरी, नळावणे, कोळवाडी – आळे, डिंगोरे, उदापूर – बनकरफाटा व खोडद येथे प्रत्येकी एक कोरोना पाँझीटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

आज कोरोनामुळे वारुळवाडी, येडगाव व आळे येथे प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
दिवसेंदिवस वाढत्या कोरोणा रुग्णांमुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरात ५०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात निष्पन्न झाल्यामुळे व एकूण एक हजार चारशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात आज पर्यंत १४८७ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील सुमारे ७८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ६३८ अँक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण ६३ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उदय गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

Previous articleयुवा धोरणाची‌ अंमलबजावणी करण्याची प्रविण मोरे यांची मागणी
Next articleतिर्थक्षेत्र विकास समितीच्या अध्यक्षपदी ह.भ.प.सुरेश कांचन महाराज यांची निवड