पोंदेवाडी येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता

प्रमोद दांगट(निरगुडसर)आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोंदेवाडी येथून २७ वर्षीय तरुण बेपत्ता झाला असून तो बेपत्ता झाली असल्याची फिर्याद त्याच्या कुटुंबीयांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोंदेवाडी येथील भूषण नवनाथ पोंदे (वय ,२७ ) हा बुधवार (दि.२) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घरातून पारगाव येथे कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेला होता तो रात्रीपर्यंत बराच वेळ घरी आला नाही त्यानंतर कुटूंबियांनी त्याला फोन केला असता त्याचा मोबाईल बंद लागत होता त्यावेळी तो कामाला असलेले पारगाव येथील खत औषध दुकानदार नानासाहेब ढोबळे यांना फोन करून विचारले असता त्यांनी भूषण आज कामावर आला नाही असे सांगितले त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा पोंदेवाडी तसेच पारगाव परिसरात आजूबाजूला शोध घेत नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो मिळाला नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाला असल्याची फिर्याद मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

बेपत्ता तरुणाचे वर्णन
भूषण नवनाथ पोंदे (वय २७ रा,पोंदेवाडी. ता,आंबेगाव) उंची ६ फूट रंग गोरा अंगाने सडपातळ नाक सरळ चेहरा उभट, अंगात निळा रंगाचा शर्ट काळी पॅन्ट असा आहे.तरी वरील वर्णनाचा तरुण कोठे आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आव्हान पोलिसांनी केले आहे.

Previous articleजुन्या भांडणाच्या रागातून लोखंडी गजाने तरूणाला बेदम मारहाण
Next articleसक्षम पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार