जुन्या भांडणाच्या रागातून लोखंडी गजाने तरूणाला बेदम मारहाण

प्रमोद दांगट (निरगुडसर)

आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे जुन्या भांडणाचा रागातून ऋषिकेश बबन थोरात ( वय ,२१) या तरुणास बेेेदम मारहाण करण्यात आली असून याबाबत त्यांनी अंकित अर्जुन थोरात याच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी ऋषिकेश हा आपल्या मित्राबरोबर सोमवार (दि.31) रोजी चांडोली बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूस उभा असताना अंकित थोरात राहणार चांडोली बुद्रुक याने तेथे येऊन जुन्या भांडणाच्या रागातून ऋषिकेशला शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी व हातातील लोखंडी गजाने डोक्यात बेदम मारहाण केली त्यावेळी ऋषिकेशच्या मित्राने भांडण सोडवले.याबाबत ऋषिकेश बबन थोरात यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मडके पुढील तपास करत आहेत

Previous articleमाहेर संस्थेच्या ‘वात्सल्यधाम’ प्रकल्पात गणेशोत्सव उत्साहात साजरा
Next articleपोंदेवाडी येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता