खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कुरकुंभ रेल्वे मोरीच्या कामाची पाहणी

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड शहरातील महत्वाचा प्रश्न असलेल्या कुरकुंभ रेल्वे मोरीच्या कामाची पाहणी खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी केली, पूर्ण झालेल्या कामाचा आढावा घेत पुढील काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन तसेच ठेकेदार यांना योग्य त्या सूचना केल्या, यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांनी कुरकुंभ मोरीच्या समस्यांबाबत निवेदन देवून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली,

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, माजी आमदार-रमेश आप्पा थोरात, जिल्हा परिषद उपाध्यक्ष-रणजित शिवतारे,पुणे जिल्हा परिषद सदस्य-वीरधवल बाबा जगदाळे,दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष-आप्पासाहेब पवार,पुणे जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष-सोहेल भाई खान,उपनगराध्यक्ष-वसीम शेख, नगरसेवक-इंद्रजित जगदाळे,युवा नेते-तुषार रमेश थोरात ,राजेंद्र उगले,अलोक उगले व मान्यवर उपस्थित होते

Previous articleसरपंचावर फसवणूकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल शिरुर तालुक्यात खळबळ
Next articleदौंड तालुक्यातील रस्ते विकासाबाबत आमदार राहुल कुल यांचे केंद्रीय मंत्री-नितीन गडकरी यांना निवेदन