दौंड तालुक्यातील रस्ते विकासाबाबत आमदार राहुल कुल यांचे केंद्रीय मंत्री-नितीन गडकरी यांना निवेदन

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

 पुणे-सोलापूर महामार्गाशी निगडित विविध समस्या,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत तालुक्यातील विविध कामांसंदर्भात दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यानी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेतली या भेटीमध्ये प्रामुख्याने –

पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव येथील भुयारी मार्ग तसेच दौंड तालुक्याच्या विविध गावांच्या हद्दीतुन जाणाऱ्या अनेक ठिकाणी प्रलंबीत असलेल्या सर्व्हिस रोड बाबत आपल्या निवेदनाची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पुढील कार्यवाहीच्या सूचना मा. मंत्री महोदयांनी याआधी केल्या आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत दौंड – आलेगाव – मलठण – खानोटा – शिरापुर – स्वामी चिंचोली या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा तसेच भीमा नदीवर दौंड (जि. पुणे) ते गार (जि. अ. नगर) यांना जोडणारा मोठा पूल मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली, याद्वारे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांची मोठी सोय होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना मिळेल तसेच कृषी मालाची वेगवान हालचाल करण्यास देखील मदत होईल हि बाब मा. मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.

पुणे-सोलापूर महामार्ग हा पुण्यालगत दाट लोकवस्ती असलेल्या गावातून जातो विशेषत: शेवाळवाडी , लोणी काळभोर, थेऊर फाटा, उरुळी कांचन इत्यादी गावांमध्ये मोठी लोकसंख्या आहे व या ठिकाणी महामार्गावरील जंक्शनमध्ये वाहतुकीची कोंडी, गर्दी ज्यामुळे बर्‍याच वेळा अपघात होतात. रस्ते सुरक्षेसाठी आणि या ठिकाणी घडणारे अपघात, इजा आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागातील महामार्गावरील मुख्य जंक्शनवर ओव्हर ब्रिज उभारण्यात यावेत अशी विनंती केली.

आपल्या विनंतीनुसार केंद्रीय मार्ग निधीस मंजुरी, भीमा नदीवर दौंड (जि. पुणे) ते गार (जि. अ. नगर) यांना जोडणारा मोठा पूल उभारणे तसेच पुणे-सोलापूर महामार्गवर दाट लोकवस्ती असणारे व अपघात प्रवण क्षेत्र ओळखून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मा. नितीनजी गडकरी साहेबांनी दिले.

Previous articleखासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कुरकुंभ रेल्वे मोरीच्या कामाची पाहणी
Next articleदौंड शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच…