सहजपूरचे सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांना जिजाऊ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

कुरकुंभ ,सुरेश बागल

दौंड तालुक्यातील सहजपूर पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांना (दि.२५ ) रोजी यवत येथे जिजाऊ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर राज्यस्तरीय ग्रामीण महिला महामेळाव्याचे आयोजन गणेश मंगल यवत येथे केलेले होते.

उमेश म्हेत्रे हे शिक्षण, कला साहित्य सामाजिक, राजकीय, पर्यावरण, सांस्कृतिक क्षेत्रात गेले अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जोपासून काम करीत आहेत आपण सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपणास या वर्षीचा ग्रामीण राज्यस्तरीय जनसेवेचा ध्यास असणारे जिजाऊ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.

अभिनेञी,कलावंत आदरणीय सुरेखाताई पुणेकर, प्रदेशाध्यक्ष त्रिदल महिला शक्ती आघाडी भारतीताई लगड ,अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका सारीकाताई भुजबळ आणि भरतजी भुजबळ याच्या शुभहस्ते जिजाऊ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रतिमा,शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले आहे .

Previous articleपुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: मजुरांना घेऊन जाणार ट्रॅक्टर पलटी महिला व लहान मुलांसह १५ जण जखमी
Next articleनिधन वार्ता – कैलास डहाळे यांचे दुःखद निधन