पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: मजुरांना घेऊन जाणार ट्रॅक्टर पलटी महिला व लहान मुलांसह १५ जण जखमी

योगेश राऊत ,पाटस

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन महिला लहान मुलांसह ७ ते ८ मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन ते तीन मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना रविवारी (ता. २७) रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील चौफुला परिसरात घडली आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौफुला बाजूकडून पुण्याच्या बाजूकडे ट्रॅक्टरचालक हा ७ ते ८ मजूर व लहान मुलांना घेऊन निघाला होता. ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात महिला लहान मुलांसह इतर ७ ते ८ मजूर गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे.

या विचित्र अपघातात ट्रॅक्टर मधील हे मजूर रस्त्यावर विचित्र अवस्थेत पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले. व जखमी मजुरांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांपैकी दोन ते तीन मजूर गंभीर मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. सदर ट्रॅक्टर मध्ये अंदाजे १५ ते १६ मजूर ट्रॅक्टर मधून प्रवास करत होते. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले .

Previous articleआग्रा ते राजगड ‘गरुड झेप’ मोहिमेचे नारायणगावात उत्साहात स्वागत
Next articleसहजपूरचे सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांना जिजाऊ सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार