महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महसूल सप्ताहाचे आयोजन

दौंड : दिनेश पवार

युवक हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.लोकशाही महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महसूल सप्ताहाचे आयोजन मतदान करून लोकप्रतिनिधी निवडायचा हक्क आपल्याला मिळावा. यासाठी युवकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी केले.ते महसूल सप्ताहनिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

युवकांनी ऑनलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करावी. यासाठी क्यू.आर.कोड शासनाने उपलब्ध करून दिला आहे.उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल दाखला,नॅशनॅलिटी, नॉन क्रिमिलियर,जातीचा दाखला काढण्यासाठी अर्ज करण्याची सोय महसूल सप्ताहनिमित्त महाविद्यालयात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.महादेव जरे होते.ते म्हणाले की,सशक्त लोकशाहीचा आधारस्तंभ युवक असतो.म्हणून युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे.हक्क म्हणून मतदान करावे.असे आवाहन त्यांनी केले.प्रास्ताविक प्रा.शहाजी मखरे यांनी केले. डॉ.राजेंद्र ठाकरे यांनी पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचालन केले.आभार प्रा. डॉ. प्रकाश साळवे यांनी मानले.या कार्यक्रमाला मंडल अधिकारी डी. एम.डहाळे,अधीक्षक राऊत, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleदौंड तालुक्यातील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
Next articleहिवरे तर्फे नारायणगाव येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश