मुक्तांकुर कोचिंग क्लासेसच्यावतीने ‘बकोरी वनराई’ प्रकल्पात वृक्षारोपण व श्रमदान

गणेश सातव,वाघोली

बकोरी (ता-हवेली) येथील माहिती सेवा समिती,स्व.दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान, ग्रामपंचायत,बकोरी व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने साकारलेल्या बकोरी वनराई प्रकल्पामध्ये मुक्तांकुर कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून वृक्षारोपण व श्रमदान करण्यात आले.

वाघोल येथील मुक्तांकुर क्लासेसचे संस्थापक नरहरी क्षीरसागर सर यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण व श्रमदानाचा उपक्रम राबवण्यात आला.गेले ३-४ वर्षापासून वाघोली परिसरात ‘मुक्तांकुर’ क्लासेसच्यावतीने अद्यापनाच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडवण्याचे सेवाकार्य सुरु आहे.

विद्यार्थ्यांना भाकरी पलीकडचे जग समजावे व त्यांच्या मध्ये निसर्ग, पर्यावरण,जैवविविधता ईत्यादी विषयाबाबत सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी असे उपक्रम ‘मुक्ताकुंर’च्या वतीने राबवले जात आहेतं.अशा उपक्रमातून एक प्रकारे सामाजिक उत्तर दायित्व पार पडत आहे,असे मत नरहरी क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

वृक्षारोपण व श्रमदान प्रसंगी जवळपास ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी करंज,चिंच,अर्जुन, वड,पिंपळ ईत्यादी देशी वृक्षांची लागवड केली.त्याचबरोबर पुर्वी लागवड केलेल्या झाडांना खत घालून,झाडा भोवती आळी करण्यात आली.

या उपक्रमासाठी बकोरी वनराई प्रकल्पाचे संस्थापक चंद्रकांत वारघडे यांनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले.

चंद्रकांत वारघडे व माहिती सेवा समिती सह सहयोगी संस्था करत असलेल्या निसर्ग सेवा कार्याबद्दल मुक्तांकुर क्लासेसच्या वतीने नरहरी क्षीरसागर सर यांनी वारघडे व त्यांच्या संपूर्ण टिमचे अभिनंदन करुन आभार मानले.

या निसर्ग संवर्धन व पर्यावरण रक्षण सेवा कार्यामध्ये परिसरातील इतरही सामाजिक संस्था,शाळा,महाविद्यालय व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन चंद्रकांत वारघडे यांना सहकार्य करावे असे आवाहन क्षीरसागर सर यांनी यावेळी केले.

Previous articleडॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कांचन यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Next articleघरफोडी करणारी टोळी गजाआड: नारायणगाव पोलिसांची कामगिरी