डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कांचन यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

उरुळी कांचन

आयुष्य हे क्षणभंगुर आहे. आयुष्याच्या सिनेमाला रिटेक घेता येत नाही किंवा रिव्हर्स घेता येत नाही. आयुष्य खूप छोटे व सुंदर आहे. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा.माणसांकडे अफाट पैसा असून देखील ते सुखी समाधानी नाही. केवळ पैशांमध्ये सुख नाही. असे असते तर सर्व श्रीमंत व्यक्ती सुखी असते ना. जुन्या काळात पैसा कमी होता, मात्र आनंद खूप होता. छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधा गणेश शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने उपस्थितीत श्रोते यांना व्याख्यानातून सांगितले. डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून सामाजिक जाणीव ठेवून अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये जेष्ठ नागरिक सन्मान, चित्रकला स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, वृक्षारोपण, गरजु विद्यार्थ्यांना शालेय वस्तू चे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, साधना सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष काळभोर, मा.सरपंच ज्ञानोबा कांचन, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, सरपंच भाऊसाहेब कांचन, जि.प.सदस्या कीर्ती कांचन, प.स.सदस्या हेमलता बडेकर, पु.जि.नि.स.माजी सदस्य संतोष कांचन, संस्थेचे संचालक शरद वनारसे, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, खेमचंद पुरुसवाणी, संजय टिळेकर, जीवन शिंदे, अनिकेत कांचन, धनसिंग पोंदकुले, सारिका काळभोर, कमल कांचन, तज्ञ संचालक रोहिदास उंद्रे, प्रविण दरेकर, व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, सह व्यवस्थापक ऋषीकेश भोसले, सरपंच सुभाष लोणकर, ग्रा.प.सदस्य संतोष कांचन, राजेंद्र कांचन, अमित कांचन, मयूर कांचन, सुनिल तांबे, आदित्य कांचन, शंकर बडेकर, संगिता काळे, सभासद, ठेविदार, कर्मचारी, सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार क्षेत्रात बदलत्या धोरणानुसार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी पारदर्शकता दाखवून संस्थेमध्ये अनेक बदल घडवून ग्राहकांना व सभासदांना काय सुविधा देता येतील यावर कटाक्षाने सामाजिक जाणीव ठेवून काम करत असल्याचे दिसत आहे अस सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी बोलताना सांगितले.

Previous articleसातत्याने महापुरुषांविषयी जातीयवादी बोलणे आणि महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे काम संभाजी भिडे करतात: दौंड तालुका काँग्रेस कमिटी
Next articleमुक्तांकुर कोचिंग क्लासेसच्यावतीने ‘बकोरी वनराई’ प्रकल्पात वृक्षारोपण व श्रमदान