सातत्याने महापुरुषांविषयी जातीयवादी बोलणे आणि महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे काम संभाजी भिडे करतात: दौंड तालुका काँग्रेस कमिटी

कुरकुंभ ,सुरेश बागल

महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये महापुरुषांविषयी जातीवादी बोलणे आणि महाराष्ट्रात दंगली घडून आणणे यामागे संभाजी भिडे यांचा मोठा हात आहे तरीसुद्धा सरकार काहीच दखल घेत नाही यामुळे दौंड तालुका काँग्रेस कमिटी यांच्याकडून दौंड पोलीस स्टेशन येथे दौंड पोलीस निरीक्षक भाऊराव पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. कालच्या कार्यक्रमांमध्ये देशांमध्ये महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते त्यांच्याविषयी जातीवादी बोलून महाराष्ट्र आणि देशातील लोकांची मते दुखावलेली आहेत. अनेक महिन्यापासून महाराष्ट्रात दंगली कशा घडतील याचे काम भिडे यांच्याकडे सोपवले आहे.

महापुरुषांबद्दल केलेले वक्तव्य आणि जातीयवादी बोलणे यामधून दंगली भडकवण्याचे काम भिडे हे सातत्याने करत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय नियंत्रण नाही. अशा व्यक्तीला महाराष्ट्र व केंद्र सरकारने लवकरात लवकर पुढाकार घेऊन कठोर अशी कारवाई करण्यात यावी. भिडेचे कुठे कार्यक्रम असतील तिथे त्याला प्रशासनाकडून परवानगी मिळू नये ,अशी प्रशासनाची विनंतीपूर्वक मागणी केलेली आहे. त्याच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा महापुरुषांचा अपमान कुणीही सहन करू शकणार नाही. महापुरुषांचा अपमान जो करतो त्याला महाराष्ट्र दोषी जाहीर करावे असे दौंड तालुका काँग्रेस कमिटी यांच्याकडून दौंड पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे. यावेळी  दौंड शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष हरेष ओझा, तालुका महासचिव प्रकाश सोनवणे, अल्पसंख्यक शहराध्यक्ष रज्जाक शेख,शहर उपाध्यक्ष विठ्ठल शिपलकर जिल्हा प्रतिनिधि अतुल थोरात,अतुल जगदाळे,निवेश बगाडे, सुरेश क्षीरसागर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleभारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त वीज कामगार महासंघाचा रक्तदानाचा महायज्ञ
Next articleडॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कांचन यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप