आषाढी वारीच्या निमित्ताने वडजाई जिल्हा परिषद शाळेत “विठ्ठल नामाची शाळा भरली”.

गणेश सातव,वाघोली,पुणे.

आषाढी वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा.
या मेळ्यात कोणालाही,कुठलही आमंत्रण न देता तहान-भूक हरवून समस्त वारकरी बांधव दरवर्षी हजारोंच्या संख्येने वारीत सहभागी होत आसतात.हि आपल्या महाराष्ट्राची पिढ्यानपिढ्या चालत आलेली धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.

अश्याचं प्रकारच्या वारीचे आयोजन उपक्रमशील जि.प.शाळा,वडजाई यांच्या माध्यमातून वडजाई येथे करण्यात आले होते.

कपाळावर केशरी गंध,गळ्यात तुळशीच्या माळा,डोक्यावर तुळशी वृंदावन,कमरेला शेला-उपरणे,हातात भवगे झेंडे,टाळ,मृंदग, वीणा,सोबत अंभगाचा गोड सूर अश्या पवित्र वातावरणात बालचमूंचा पालखी सोहळा वडजाई शाळेपासून ते आव्हाळवाडी येथील खंडोबा मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात पालखीसोबत,बाल विठ्ठल व रखुमाई, भालदार,चोपदार आदी वारीतील कलाकृती मुलांच्या माध्यमातून उपस्थिती पालकांना व ग्रामस्थांना पहायला व अनुभवयास मिळाली. यावेळी ज्ञानोबा-तुकाराम व इतरही संतांच्या नावाने जयघोष करण्यात आला. पालखी सोहळा निळकंठेश्वर मंदिर परिसरात पोहचताच मुख्याध्यापक शंकर बडे सर यांनी केलेल्या अंभगरुपी सादेवर बाल वैष्णवांचे गोल रिंगण पार पडले.अभंगाच्या तालावर मुलांनी ठेका धरून वारकरी नृत केले.सोबत फुगडी खेळून वारीचा आत्मानंद घेतला.

मुख्याध्यापक शंकर बडे यांच्या मार्गदर्शनाखाली खोसे मँडम व वैष्णवी सातव यांनी या सुंदर सोहळ्याच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली.शेवटी खाऊ वाटप करून सोहळ्याची सांगता झाली.

Previous articleशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त ‌‘विठू माऊली माझी’ कार्यक्रम
Next articleऋतिक गोंधळी यांचा संशयास्पद मृत्यू: संशयास्पद मृत्यू झाला असल्याचा युवकाच्या नातेवाईकांचा आरोप