बाळू भवारी तीन वेळा नेट परिक्षा उत्तीर्ण

मोसीन काठेवाडी

घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाचे माजी विद्यार्थी प्रा.भवारी चंद्रकांत बाळू हे UGC ने डिसेंबर २०२२ मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत ते मराठी विषयात नुकतेच उत्तीर्ण झाले आहे.

 

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. तुकाराम काळे, उपाध्यक्ष श्री. शामशेठ होनराव, सचिव श्री. अक्षय काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड. मुकुंदराव काळे,कार्याध्यक्ष श्री. राजेश काळे,न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल कमिटीचे चेअरमन श्री.बाळासाहेब काळे प्रभारी प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर,उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गव्हाळे, डॉ. पुरुषोत्तम काळे, प्रा.पोपटराव माने, श्री.बाळू पोटे,अधिक्षक श्री.अशोक काळे,श्री.गणेश काळे श्री.बाळू काळे,श्री.विनोद काळे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,सेवक,इ.नी त्यांचे अभिनंदन केले आहे.श्री.भवारी यांनी गोहे सारख्या दुर्गम भागात राहून महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊन अतिशय जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने हे यश मिळविले आहे.प्रा.भवारी हे पुणे शहरातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.प्रा.भवारी हे मराठी विभागातील आजमीतीस नेट/सेट उत्तीर्ण झालेल्या एकुण विद्यार्थ्यांमध्ये 21 वे माजी विद्यार्थी आहेत.विभागातील 21 विद्यार्थी आजमितीस एकुण 26 वेळेस सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.

Previous articleगौतमी पाटील चा कार्यक्रम अनोख्या बंदोबस्तामुळे शांततेत : बंदोबस्तासाठी बाऊंसर, पोलिसांसह महिलांच्या हातात काठ्या
Next articleबी.डी. काळे महाविद्यालयात डॉ.आंबेडकर जयंती विविध उपक्रमाने साजरी