महावितरण मधील कंत्राटी कामगारांचे प्रश्नां बाबत लेबर ऑफिस पुणे येथे लाक्षणिक उपोषण

कुरकुंभ , सुरेश बागल

सातारा जिल्ह्यातील ०६ वीज कंत्राटी कामगारांना आकसामुळे कामावर हजर करून घेत नसल्यामुळे , कामगारांच्या वेतना मधुन दरमहा रू ११००ते १५०० रू. प्रमाणे बेकायदेशीर पणे वजावट केलेले सुमारे ऐक कोटी त्रेचाळी लाख रू त्वरित वसुली करून कामगारांना देण्यात यावेत या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेचे उपमहामंत्री श्री राहुल पांडुरंग बोडके यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सहा प्रमुख कागार व काही प्रतिनिधी मा.अप्पर कामगार आयुक्त कार्यालय,शक्ती चेंबर,संगमवाडी, पुणे येथे आज बुधवार दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी लाक्षणिक उपोषण करून शासनाने या बाबतीत त्वरित कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

वीज मंडळ शिकाऊ उमेदवार संस्था सातारा या कंत्राटदाराने सातारा जिल्ह्यातील ६ वीज कंत्राटी कामगार व पदाधिकारी यांनी बेकायदेशीर वजावटी ला विरोध केला व कायद्या चे पालन करावे अशी मागणी केली होती. या आकसामुळे ०१ जानेवारी २०२३ पासून कामावर हजर करून घेतले नाही.

या संस्थेने सातारा जिल्ह्यातील कामगारांच्या पगारातून अनधिकृतपणे ११०० रु. इन्शुरन्सच्या नावाखाली परस्पर काढून घेतलेले आहे आणि हीच घटना या ०६ कामगारांनी महावितरण प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली व या संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल केल्यामुळे या ०६ कामगारांना शिकाऊ उमेदवार संस्थेने आकसापोटी कामावर रुजू करून घेतले नाही.

याबाबत संघटनेने माहे ३०जानेवारी २०२३पासून सातारा जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता कार्यालयास पत्र व्यवहार व संपर्क करूनही कोणतीही दखल घेतली नाही तसेच मा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय पोवई नाका सातारा येथेही या ०६ वीज कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यासाठी दिनांं ०६ मार्च २०२३,१६ मार्च २०२३ व २३ मार्च २०२३रोजी सुनावण्या झालेल्या आहेत ०५ नुसार मा सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांनी या ०६ कामगारांना पुन्हा कामावर हजर करून घेण्यास मा अधीक्षक अभियंता सातारा यांना आदेश दिलेले असून तेथील मा अधीक्षक अभियंता याबाबत कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही तसेच हे ०६ वीज कंत्राटी कामगार मा ठाणे औद्योगिक न्यायालय येथे सुरू असलेल्या कोर्ट केस नंबर Reference ( IT) No. २१ of २०१८व Reference (IT) No. १८of २०२२ मधील आहेत या ०६वीज कंत्राटी कामगारांना मा ठाणे औद्योगिक न्यायालय यांनी जो पर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत या कामगारांना कामावरून कमी करू नये असे आदेश महावितरणला दिलेले असताना देखील महावितरण प्रशासन सातारा या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे संघटना मा अधीक्षक अभियंता यांनी मा.औद्योगिक न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी लवकरच अवमान याचिका दाखल करणार आहे. या अन्याग्रस्त ०६ वीज कंत्राटी कामगारांना जो पर्यंत कामावर हजर करून घेत नाही व वीज मंडळ शिकाऊ उमेदवार संस्था सातारा या संस्थेचे लायसन्स कायमचे रद्द करत नाही व मा.अधीक्षक अभियंता सातारा यांच्यावर खटला भरला जात नाही तो पर्यंत संघटनेचा संघर्ष चालू राहणार आहे असे संघटनेने सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी मार्गदर्शन करताना केले आहे.

या वेळी मा.सहाय्यक कामगार आयुक्त श्री. प्रवीण जाधव यांनी त्रिपक्षीय बैठक घेवून या बाबतीत सविस्तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे. या वेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहूल बोडके, पुणे जिल्हा सचिव निखिल टेकवडे, दिलीप शिंदे व महावितरण प्रशासनाच्या वतीने उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीश काटकर उपस्थितीत होते.

कामगारांना न्याय मिळाला नाही व दोषी संस्थेवर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्र जी फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानी आंदोलन करण्यात येईल असा ईशारा संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी दिला आहे.

Previous articleपत्रकारास मारहाण प्रकरणी कारवाई होण्याबाबत दौंड भारतीय पत्रकार संघाकडून दौंड पोलीस स्टेशन येथे निवेदन
Next articleपाटस येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद