पत्रकारास मारहाण प्रकरणी कारवाई होण्याबाबत दौंड भारतीय पत्रकार संघाकडून दौंड पोलीस स्टेशन येथे निवेदन

कुरकुंभ,सुरेश बागल

पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. संदीप बनसोडे यांना सासवड या ठिकाणी राहणाऱ्या अशोक जाधव व त्यांचे ६ ते ७ सहकारी यांनी लाथा बुक्क्यासह लोखंडी गजाने जबर मारहाण केली. यामध्ये श्री संदीप बनसोडे यांचे मामा दत्तात्रेय वाघमारे यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. याबाबत सासवड पोलीस ठाणे येथे विविध कलमांतर्गत बनसोडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु अशोक जाधव सह त्यांचे सर्व साथीदार फरार असून लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर पत्रकारास मारहाणी प्रकरणी अटक करून त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी.

अन्यथा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनामध्ये दिलेला आहे. पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. संदीप बनसोडे यांच्यावर झालेल्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून दौंड भारतीय पत्रकार संघाच्या वतीने दौंड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. दौंड पोलीस स्टेशन येथील ठाणे अंमलदार भरत जाधव यांना निवेदन देताना पुणे जिल्हा भारतीय पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष वरिष्ठ पत्रकार राजेंद्र मनोहर सोनवलकर, दौंड तालुका भारतीय पत्रकार संघाचे सदस्य सुरेश बागल, प्रा. महेश पांडुरंग देशमाने, राजेंद्र वसंतराव कद्दू, विलास कांबळे, संदीप बारटक्के विकी ओहोळ उपस्थित होते.

Previous articleभारतीय मजदूर संघाचे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने
Next articleमहावितरण मधील कंत्राटी कामगारांचे प्रश्नां बाबत लेबर ऑफिस पुणे येथे लाक्षणिक उपोषण