दौंडमध्ये रविवारी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

दौंड:दिनेश पवार

शिवजयंती उत्सव समिती दौंड शहर व तालुका यांच्या वतीने शिवजयंती निमित्त रविवार दि.16 एप्रिल 2023 रोजी,सकाळी दहा वाजता स्व.लाजवंती गॅरेला हायस्कूल दौंड येथे वक्तृ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत पहिली ते चौथी या गटात शिवरायांचे बालपण,स्वच्छतेचे महत्व,माझा आवडता स्वराज्याचा शिलेदार,पाचवी ते आठवी साठी बहुजन नायक छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,चला मोबाईलची चांगली बाजू पाहूया,नववी ते बारावी साठी युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज,स्वातंत्रोतर भारताच्या जडणघडणीत स्त्रियांचे योगदान, शाहू,फुले,आंबेडकर विचारांचा वारसा व भारत व खुल्या गटासाठी जागतिक राजनेतृत्वाचा मानदंड छत्रपती शिवाजी महाराज, कोरोना नंतरचे जग,स्वराज्याचा धगधगता यज्ञकुंड छत्रपती संभाजी महाराज असे विषय ठेवण्यात आले आहेत,आशा चार गटात ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे, विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्माचिन्ह,रोख पारितोषिक दिले जाणार आहे,अधिक माहिती साठी सोमनाथ लवंगे – 7083276183 प्रा.डॉ.अरुणा मोरे 9850014573 यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती ने केले आहे

Previous article३२ वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग..!!
Next articleप्रा. डॉ. संदीप वाकडे यांना “राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव” पुरस्कार प्रदान