३२ वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग..!!

राजगुरूनगर – वाफगाव (ता.खेड) येथील श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयामध्ये ०७ एप्रिल २०२३ रोजी गुडफ्रायडेच्या दिवशी सन १९९०–९१ मध्ये दहावीला शिकलेले माजी विद्यार्थी-विद्यार्थीचा स्नेहमेळावा आणि त्यांच्यावतीने गुरुजनांचा कृतज्ञता सन्मान सोहळा शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने केली. दिवंगत माजी विद्यार्थी व शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुवर्य बी.एस.काळे, जनार्दन खरात, रशीद शेख, दत्तात्रेय होजगे, मेहमुद मुलाणी, अरुण सुतार, शिवाजी कराळे यांना ‘जीवन गौरव कृतज्ञता सन्मान’ मानपत्राने गौरविण्यात आले. तर विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक शशिकांत तासगावकर, शिक्षक सुनिल घुमटकर, विजय कराळे, विजय सांडभोर, अशोक कराळे यांना आदर्श शिक्षक सन्मानपत्राने गौरविण्यात आले.

माजी विद्यार्थी, शिक्षकनेते धर्मराज पवळे यांनी हा मेळावा घेण्यासाठी सर्वांनी कसे प्रयत्न केले, मित्र कसे शोधले, मेळाव्याच्या कोअर कमिटीने कशा पद्धतीने यशस्वी नियोजन केले याचा आढावा घेतला.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणी, गंमती जंमती, विविध प्रसंग सांगितले व या शाळेमुळेच आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहोत अशा कृतज्ञ भावना व्यक्त केल्या.शाळेप्रती कर्तव्य म्हणून वसतिगृह व विद्यालयासाठी योगदान देण्याचे यावेळी जाहिर करण्यात आले.

कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमेरिकेहून आलेला माजी विद्यार्थी उदय सांडभोर, नाशिकचे प्रसिद्ध डाॅ.मनोज सुर्वे, कामगार नेते रोहिदास आडवळे, युवानेते संतोष थिटे, सरपंच ज्ञानेश्वर ढेरंगे, प्रा.नवनाथ वाळुंज, युवानेते प्रदिप वाघोले, निवेदक बाळासाहेब पिंगळे,युवानेते प्रकाश मांदळे, कामगार नेते बाबाजी पवळे, अॅड.माणिक वायाळ, आडतदार एकनाथ रामाणे, कामगार नेते उल्हास पानसरे, अपंग सेलचे कार्यकर्ते दिलीप येवले, हाॅटेलमालक बाळासाहेब घोंगाणे, उद्योजक महेंद्र सोनार, प्रा.विश्वनाथ कांबळे, उद्योजक संजय तांबे टेलर, बांधकाम व्यावसायिक विजय रणपिसे, उद्योजक महेश थिगळे,युवानेते किरण आनंदराव, ग्रा.पं.सदस्य बाळासाहेब रणपिसे, सोसायटीचे सचिव दादाभाऊ मांदळे,उद्योजक सत्यवान रामाणे,उद्योजक शैलेश शिंदे, लेखक पंडीत लंगोटे, उद्योजक दत्तात्रय कोरडे, उद्योजक सुरेश पिंगळे, युवानेते बाळासाहेब ढेरंगे, युवा नेते संजय थिटे, उद्योजक संदिप आडवळे, अध्यक्ष सुनिल तांबे पाटील, उद्योजक साहेबराव आडवळे, बिरसा ब्रिगेडचे नेते काळूराम शिंदे, उद्योजक विलास पवळे, उद्योजक तुकाराम नायकवाडी, उपाध्यक्ष सुधीर पिंगळे,उद्योजक नवनाथ रणपिसे,उद्योजक हनुमंत मांदळे, युवामित्र विकास आडवळे, कामगार नेते शिवाजी खंडागळे, युवा नेते अशोक चौधरी, उद्योजक समीर इनामदार, युवामित्र बाळू ढेरंगे, प्रा.सतिश दरवडे, युवामित्र सुरेश ढेरंगे, आदींनी परिश्रम घेतले.

या स्नेह संमेलनासाठी अनेक माजी विद्यार्थीनीही सहभागी झाल्या. उज्वला लोखंडे, आशालता सुर्वे, वनिता अत्रे, अरुणा रामाणे, रंजना गुळाणकर, सुनिता आनंदराव आदी विद्यार्थीनीही दूर सासरहून आल्या होत्या.

या स्नेह मेळाव्यासाठी ५७ माजी विद्यार्थी व ७ माजी शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षकनेते धर्मराज पवळे यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक बाळासाहेब पिंगळे यांनी केले तर आभार युवामित्र रोहिदास आडवळे यांनी मानले.

Previous articleराजा आदाटे यांची मुंबई अध्यक्षपदी फेरनिवड
Next articleदौंडमध्ये रविवारी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन