राजा आदाटे यांची मुंबई अध्यक्षपदी फेरनिवड

श्रावणी कामत

मुंबई :मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी राजा आदाटे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.. परिषदेचे मुख विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज कर्जत येथे ही घोषणा केली.

अन्य पदाधिकारयांच्या देखील यावेळी नियुक्त्या करण्यात आल्या.. कार्याध्यक्षपदी संजय मिस्कीन, सचिवपदी दीपक पवार, उपाध्यक्ष म्हणून विनायक सानप, तर कोषाध्यक्ष म्हणून पांडुरंग म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. मुंबई संघटक म्हणून मंदार पारकर यांची निवड केली गेली आहे.

एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहे

Previous articleदौंड तालुक्यातील खामगाव येथे खून करून फरार झालेला आरोपी जेरबंद, यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई
Next article३२ वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग..!!