सोहम हेल्थकेअर कंपनीकडून गुरुकुल प्राथमिक शाळेस एलसीडी स्क्रीन भेट

योगेश राऊत, पाटस

सोहम हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी कुरकुंभ एम .आय.डीसी कंपनीच्या माध्यमातून सीएसआर फंडातून आज दौंड तालुक्यातील पाटस येथील प्राथमिक गुरुकुल शाळेत मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी डिजिटल स्वरूपात मुलांना अभ्यास करता यावा यासाठी एलसीडी स्क्रीन भेट देण्यात आली .

जगाच्या पाठीवरती मुलांना घेऊन जाण्यासाठी आधुनिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी संगणकीय प्रणालींचा वापर करणे खूप गरजेचे आहे असे मत ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल भागवत सरांनी यावेळी व्यक्त केले. आजची लहान मुले ही येणाऱ्या उज्वल राष्ट्राची भवितव्याची खरी संपत्ती आहे त्यांना डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी कंपनीच्या माध्यमातून मदत करण्याचे काम केले आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते अनिल शितोळे यांनी व्यक्त केले आहे. पाटस गावच्या सरपंच सौ अवंतिका ताई शितोळे यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ असेल तर ते शिक्षण आहे शिक्षणामुळे आपण आपले भवितव्य चांगल्या प्रकारे घडवू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी सोहम कंपनीचे अधिकारी निखिल सर, पाटस ग्रामपंचायत सरपंच अवंतिका शितोळे,पाटस ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल भागवत सर, सामाजिक कार्यकर्ते अनिल शितोळे,गुरुकुल प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष सोनवणे सर, गोलांडी मळा शाळा समिती अध्यक्ष महेश कुदळे गुरुकुल प्राथमिक शाळा मुख्याध्यापक दिवेकर सर, चौधरी सर, नवले सर, बनकर मॅडम, पोळ मॅडम भागवत विद्यालय उच्च माध्यमिक विभाग कोळेकर सर, हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौधरी सर व कार्यक्रमाची प्रस्तावना दिवेकर सर यांनी केली व उपस्थित मान्यवरांचे आभार कोळेकर सर यांनी मानले.

Previous articleव्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अशफाक पटेल यांची निवड
Next articleयशाबाबत शॉर्टकट निवडू नका – वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे