व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अशफाक पटेल यांची निवड

नारायणगाव : (किरण वाजगे) : – जुन्नर तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणारे युवा शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष व सजग टाइम्सचे मुख्य संपादक प्रा.अशफाक पटेल यांची व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघाच्या डिजीटल विभागच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ही निवड व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, डिजीटल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, सरचिटणीस अभिजीत कांबळे यांसह महाराष्ट्र कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

सदर निवडीबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार महेश लांडगे, चेअरमन सत्यशील शेरकर, मंगलदास बांदल, जिल्हा नियोजन सदस्य आशाताई बुचके, तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे, माजी पंचायत समिती सदस्य अर्चना माळवदकर, आशिष माळवदकर, सरपंच योगेश पाटे, उद्योजक अभय कोठारी, ऍड. कुलदीप नलावडे, तसेच पुणे जिल्ह्यासह जुन्नर, नारायणगाव व परिसरातील सामाजिक, राजकीय, पत्रकारिता यांसह विविध संस्था व मान्यवरांकडून त्यांच्या निवडीबद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यानिमित्ताने व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून विविध शिबिर आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून डिजिटल पत्रकारांना प्रशिक्षित करू असा विश्वास त्यांनी नियुक्ती निमित्त व्यक्त केला आहे.

Previous articleगौतमी पाटीलच्या नृत्याला बंदी घातल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड; गौतमीच्या ऐवजी हिंदवी पाटीलचा परफॉर्मन्स
Next articleसोहम हेल्थकेअर कंपनीकडून गुरुकुल प्राथमिक शाळेस एलसीडी स्क्रीन भेट