गौतमी पाटीलच्या नृत्याला बंदी घातल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड; गौतमीच्या ऐवजी हिंदवी पाटीलचा परफॉर्मन्स

 किरण वाजगे

नारायणगाव
बातमी आहे सातत्याने प्रकाशझोतात व सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटील ची…

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अन्नापुर येथे गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला शिरूर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आयोजकांसह गौतमी पाटीलवर आलीय.

अन्नापुर येथे हनुमान जयंती निमित्त गौतमी पाटील च्या डीजे डान्स शोच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आयोजकांवरती गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली असून कार्यक्रम स्थळी गौतमी पाटील येऊनही तीने परफॉर्मन्स केला नाही.

यावेळी आयोजकांनी गौतमी पाटीलची सहकारी नृत्यांगना हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे बोलले जात आहे.

Previous articleकर्णबधिर मुलांसाठी कोक्लिया संस्थेच्या वतीने मोफत प्रशिक्षण
Next articleव्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अशफाक पटेल यांची निवड