स्वाती शिंदे यांना सर फाऊंडेशन’चा नॅशनल अवॉर्ड प्रदान

राजगुरूनगर- स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन) महाराष्ट तर्फे राष्ट्रीय स्तर नवोप्रकम स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली होती. सिंहगड  कॉलेज  सोलापूर  येथे  नुकतीच भारतातील उपक्रमशील शिक्षकांची  कार्यशाळा सर फाउंडेशने घेतली या कार्यशाळेमध्ये शिक्षकांनी  व सामाजिक संस्थांनी आपल्या  शाळेमध्ये राबवलेले  उपक्रम  सादर  करण्यात  आले . यामध्ये  स्वाती शिंदे (मुबंई माता बाल संगोपन संस्था ) यांनी ग्रामीण शिक्षणात बदल घडवणे विद्यार्थ्याचा शारीरिक ,मानसिक विकास करण्यासाठी जे प्रकल्प राबवले जातात अशा उपक्रमांचे सादरीकरण केले होते.त्या उपक्रमास सर फाऊंडेशन यांनी टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड 2022 हा राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्रीने विजेते गिरीश प्रभुणे सरांच्या हस्ते  दिला.

पुरस्कार सोहळ्यासाठी  दयानंद कॉलेजचे  मा. प्राचार्य , शिक्षणतज्ञ श्री ह ना जगताप सर, सिंहगड कॉलेजचे प्राचार्य नवले सर, लातूर  डायट च्या अधिव्याख्याता डॉ.भागीरथी गिरी मॅडम , मुंबई माता बाल संगोपन संस्थेचे सचिव डॉ माधव साठे, जिल्हा  अहमदनगर,अकोले येथील  शिक्षण  तज्ञ भाऊसाहेब चासकर सर ,उपेक्षितांच्या जीवनावर काम करणारे , बालाजी अमाईन्स चे चेअरमन  शराम रेड्डी सर, सोलापूरचे माजी शिक्षणाधिकारी तथा माजी उपसंचालक,  प्रदीप मोरे  आदी मान्यवर या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित होते.

सर फाउंडेशन ही  देशातील शिक्षकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते 14 राज्यातून शिक्षक व संस्था या स्पर्धेसाठी सहभागी झाल्या होत्या . नुकतीच दोन दिवशीय कार्यशाळा घेऊन उपक्रमशील शिक्षकांचा व समाजसेवकांचा गौरव त्या ठिकाणी केला जातो .महाराष्ट्र राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे सर , बाळासाहेब वाघ सर हेमा शिंदे वाघ मॅडम , राजकिरण चव्हाण सर , अनघा जाहागीरदार मॅडम यांच्या उपस्थितीत स्वाती शिंदे यांना प्रमाणपत्र,ट्रॉफी,शैक्षणिक पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले .

Previous articleग्रामोन्नती मंडळ मुक्त कृषि शिक्षण केंद्राचा विद्यार्थी ॲडव्होकेट राहुल पडवळ यांना सुवर्णपदक
Next articleशिरदाळे येथे पारंपरिक पद्धतीने होळी व धुलवड साजरी