आंबेगाव तालुक्यात युवकांचा भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश

मोसीन काठेवाडी , घोडेगाव

नुकत्याच झालेल्या घोडेगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वार्ड क्रमांक ५ ची निवडणूक ताकतीने लढवली असे घोडेगाव शहरातील निलेश खंडू काळे व शामल निलेश काळे यांचा आज भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे,संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, युवा मोर्चा,जिल्हा उपाध्यक्ष राजेश काळे,तालुका उपाध्यक्ष ज्योती काळे, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुनील काळे,जेष्ठ नेते विजेंद्र कोकणे,सुदर्शन जबुंकर,सागर काळे, कोळवाडी कोटामदरा अध्यक्ष निलेश काळे,अभिषेक राजगुरू आदी उपस्थित होते.

माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे व जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत नारोडी, लांडेवाडी,नारोडीफाटा येथील सुदर्शन जंबुकर,अक्षय जंबुकर,अविनाश जंबुकर,अक्षय हुले, अविनाश हुले,स्वप्निल जंबुकर,घनश्याम जंबुकर,संदेश वाघमारे, गजानन वाघमारे व अनेक तरुण कार्यकर्त्यानी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
येणाऱ्या काळात अनेक युवा कार्यकर्ते पक्षात प्रवेश करणार असुन आंबेगाव तालुक्यात लवकरच भाजपचा झेंडा फडकेल असे आश्वासन भाजपा आंबेगावच्या वतीने माध्यमाशी बोलताना भारतीय जनता पार्टीचे आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉॅ.ताराचंद कराळे यांनी दिले.

Previous articleकै.डॉ.तानाजी लक्ष्मण घारे यांच्या अकाली निधनाने डॉक्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शोकसभेचे आयोजन
Next articleनारायणगाव ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने प्रशासक सत्तेवर : विस्तार अधिकारी के.बी.मोरे यांनी स्वीकारला पदभार