नारायणगाव ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने प्रशासक सत्तेवर : विस्तार अधिकारी के.बी.मोरे यांनी स्वीकारला पदभार

नारायणगाव ( किरण वाजगे) : जुन्नर तालुक्यात अग्रेसर असलेल्या नारायणगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व ग्रामपंचायत सदस्य यांची पाच वर्षाची मुदत पूर्ण झाली असून. नारायणगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के.बी.मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

आज गुरुवार दि. २३ रोजी सकाळी विस्तार अधिकारी मोरे यांनी प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकरे, माजी सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच आरिफ आतार, संतोष वाजगे, संतोष दांगट,संतोष पाटे, गणेश पाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मोरे म्हणाले की, नारायणगाव ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे.

पिण्याचे पाणी, सांडपाणी, आरोग्य, स्वच्छता व कर आकारणी याकडे विशेष लक्ष दिले जाईल. ग्रामस्थांनी मार्च पूर्वी पाणी पट्टी व मालमत्ता कर भरून सहकार्य करावे असे आवाहन मोरे यांनी केले.

या वेळी सरपंच पाटे व ग्रामविकास अधिकारी नाईकरे यांनी प्रशासक मोरे यांचे स्वागत केले.

Previous articleआंबेगाव तालुक्यात युवकांचा भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश
Next articleप्रा. डॉ. जे. पी. भोसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार