यवत येथे आरोग्य सेवकाला तलवारीने मारण्याचा प्रयत्न; एकावर गुन्हा दाखल

योगेश राऊत पाटस

दौंड तालुक्यातील यवत गावाजवळ असणाऱ्या भुलेश्वर रोडवर हातात तलवार घेऊन आरोग्यसेवकाला शिवीगाळ दमदाटी करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत यवत पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी योगेश घाटे ( आरोग्यसेवक रा. यवत ता. दौंड ) हे त्यांचा आतेभाऊ दत्तात्रय गायकवाड (रा. नायगाव, ता. पुरंदर) याला त्याच्या घरी सोडवायला जात असताना भुलेश्वर रोडवर असणाऱ्या सुहाना कंपनीच्या गोडाउन गेटचे समोर गाडी आल्यानंतर आरोपी दत्तात्रय गायकवाड याने त्यांना गाडी बाजूला घ्यायला लावली आणि जोगेश्वरी फॉर्मच्या भिंतीच्या जवळ फिर्यादीला घेवुन जावुन आरोपीने झुडुपात लपवुन ठेवलेली धारदार तलवार बाहेर काढुन घाटे यांना शिविगाळ करत तुम्हाला सगळ्यांना लय माज आलाय काय, तुम्हाला सगळयांना बघतोच असे म्हणुन दमदाटी करून दहशत केली. विशेष म्हणजे घाटे आणि गायकवाड हे दोघे आते भाऊ असून गायकवाड याने नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली हे मात्र समजू शकले नाही.

हि घटना घडल्यानंतर घाटे यांनी यवत पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी गायकवाडवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो फरार आहे. अधिक तपास पोह. लोखंडे करीत आहेत.

Previous articleउरुळी कांचन – महाराजा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
Next articleपद्मश्री मणीभाई देसाई महाविद्यालयातील विद्यार्थिनीला ‘जिओ फेस’ राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक