शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेना- युवासेनेच्या शाखेचे वारजे येथे दिमाखात उद्घाटन

योगेश राऊत

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेना- युवासेनेच्या शाखेचे पुण्यातील वारजे येथे दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख पुणे श्री रमेशबाप्पू कोंडे, युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य श्री. किरण साळी, बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहरप्रमुख श्री. नाना भानगिरे, युवासेना पुणे शहरप्रमुख श्री. निलेशभाऊ गिरमे, युवासेना जिल्हाप्रमुख पुणे श्री. निलेशभाऊ घारे, शिवसैनिक श्री. जगदीश धुमाळ, तेजस पाबळे, विशाल रासकर, विकास ( काका ) शितोळे व खडकवासला मतदार संघातील शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना- युवासेना पुणे जिल्हाप्रमुख निलेश घारे यांनी बाळासाहेबांची शिवसेनेच्या अजून अनेक शाखा प्रत्येक भागात सूरु करणार असून प्रत्येक जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही अहोरात्र कष्ट करणार असल्याचे सांगितले

Previous articleभीमा नदीपात्रात पाच दिवसात एकाच कुटुंबातील आढळले चार जणांचे मृतदेह ; ३ लहान मुले बेपत्ता
Next articleआदिवासी ठाकर समाजातील महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन करून समाजापुढे केला एक आदर्श निर्माण