मंचर येथील साई फाउंडेशनच्या तर्फे अपंग महिलेला शिलाई मशिन भेट

मोसीन काठेवाडी,मंचर

मकर संक्रांत सणाचे औचित्त साधून मंचर येथील साई फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे अध्यक्ष अजय घुले यांनी येथील दीपा गावडे या अपंग महिलेला आपला चरितार्थ चालविण्यासाठी शिलाई मशिन भेट दिली.

या प्रसंगी मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर शेटे, रुपाली पवार व अजय घुले यांच्या हस्ते दीपा गावडे यांना ही शिलाई मशीन भेट देण्यात आली.

यावेळी पप्पूशेठ उर्फ प्रवण थोरात, भरत मेंगडे, प्रसाद बोऱ्हाडे, निलेश गावडे, ओंकार चासकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleअनैतिक संबंधातून महिलेचा खून ; माव्याची पुडी व ओढणीच्या बारकोड मुळे खूनाच्या गुन्ह्याची उकल
Next articleतमाशाप्रधान चित्रपटातून गौतमी पाटील पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर ; संदीप डांगे दिग्दर्शित “घुंगरू” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला