राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा ,स्वामी विवेकानंद जयंती व मराठा दिनदर्शिका २०२३ चा प्रकाशन सोहळा संपन्न

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय व धर्म रक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या युगपुरुषांना घडविणाऱ्या स्वराज्याचे आद्य स्फूर्ती केंद्र राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा स्वामी विवेकानंद जयंती व मराठा दिनदर्शिका विषय २३ चे प्रकाशन समारंभ मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आला,छत्रपती शिवाजी महाराज चौक दौंड येथे उल्लासात पार पडला यावेळी समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा जिजाऊ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

कांचन कुल,शितल कटारिया,वैशाली नागवडे, मंदाकिनी चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी डॉ. सुरेखा भोसले,स्वाती गिरमकर, अनिता दळवी,आकांक्षा काळे, मीरा वीर,अॅड. अरुणा डहाळे या विचारमंचावर उपस्थित होते.

विपरीत परिस्थितीवर मात करून आपले कुटुंब सावरणाऱ्या आपल्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण, चांगले संस्कार देणाऱ्या इंदुताई रुपनवर, सारिका कुलकर्णी,शशिकला मखरे, सीमा मचाले, फुलाबाई मोहरकर, शोभा शिंदे,आशा मोटे, मंगल फरड, कांचन गोसावी, सुभद्रा दुधाट, सुमन काळे,सिमा शिदगणे स्वामी तसेच मराठा महासंघाच्या मार्गदर्शिका प्रा. अरुणा मोरे यांची इतिहास परिषदेवर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्रावणी मगर व शरयु मेरगळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन राधिका काटे व संपदा दुधाट यांनी केले प्रास्ताविक सविता भोर यांनी केले तर आभार रोहिणी जगताप यांनी मांनले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या राणी जांभले, सीमा दिवेकर, लीला कवडे,अदिती थोरात, मीना जाधव, पूजा वीर,यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleवृत्तपत्र लेखक श्याम ठाणेदार राज्यस्तरीय पत्रभूषण पुरस्काराने सन्मानित
Next articleनॅशनल जम्बोरीत मराठा स्कूल व एस एस एम मोहनबाई चुनीलाल मेहता गर्ल शाळेचा सहभाग