वृत्तपत्र लेखक श्याम ठाणेदार राज्यस्तरीय पत्रभूषण पुरस्काराने सन्मानित

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संस्थेच्या वतीने वृत्तपत्र लेखक श्याम ठाणेदार यांना राज्यस्तरीय पत्रभूषण पुरस्कार २०२३ हा मानाच्या पुरस्कार देऊन सन्मानित केले आले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचा २२ वा वर्धापन दिन तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुंबईतील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात राज्यातील वृत्तपत्र लेखकांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी राज्यभरातील पत्रकार, संपादक,वृत्तपत्र लेखक तसेच सामाजिक क्षेत्रांत काम करणारे मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

श्याम ठाणेदार हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्तपत्र लेखक असून ते महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रात लेखन करतात. विविध विषयांवरील त्यांचे हजारो लेख विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले असून महाराष्ट्रभर त्यांचा वाचकवर्ग आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेने पत्रभूषण २०२३ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.श्याम ठाणेदार यांना याआधीही विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Previous articleगुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एकत्र येणे आवश्यक- सरपंच योगेश पाटे
Next articleराजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा ,स्वामी विवेकानंद जयंती व मराठा दिनदर्शिका २०२३ चा प्रकाशन सोहळा संपन्न