जिजाऊ माँसाहेबांच्या चरित्रग्रंथात आजही हजारो शिवबा घडविण्याची ताकद – वैशाली मुके

राजगुरुनगर ( विशेष वृत्त )

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या चरित्रग्रंथात आजही हजारो शिवबा घडविण्याची ताकद असून याकरिता आजच्या सुशिक्षित मातांनी राजमाता जिजाऊ आणि शिवचरित्राचा जाणीव पूर्वक अभ्यास करावा,असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी कमान येथील इतिहास प्रेमी सहशिक्षिका वैशाली मुके यांनी केले आहे.

आज जिल्हा परिषदेच्या बारापाटी शाळेतील विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देण्यात आला.देव देश आणि धर्म या तीन गोष्टींवर समाजाची वैचारिक जडणघडण होत असते.शिवरायांच्या अलौकिक चरित्रातून सर्वांनाच सातत्याने उर्जा मिळते आणि म्हणूनच शेकडो वर्षांनंतरही एक अविरत उर्जेचा स्त्रोत म्हणून शिवरायांचा इतिहास विविध अंगांनी ‌पुन्हा पुन्हा अभ्यासायला हवा आहे.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थीनींनी आम्ही जिजाऊच्या लेकी या गीतावर नृत्य सादर केले.
मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकला.शाळेतील विद्यार्थीनींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

Previous articleलोणावळा येथील ऑक्सि्लीयम कॉन्व्हेंट शाळेच्या विद्यार्थींनीचा नॅशनल जम्बोरीमध्ये सहभाग
Next articleजिजाऊ माँसाहेबांच्या चरित्रग्रंथात आजही हजारो शिवबा घडविण्याची ताकद – वैशाली मुके