“क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले सन्मान २०२३” पुरस्कार देऊन सन्मान : टिळेकरवाडी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम

उरुळी कांचन

क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती निमित्त ग्रामपंचायत टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मेघना सं. झुझम (भिंबरपाटील) यांचे ” मी तुमची सावित्रीबाई फुले ” हे एकपात्री नाटका मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जन्म ते मृत्यू पर्यंतचा प्रवास सादर केला. तसेच जि. प. शाळा येथील मुलांचे वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या २० महिलांना ” क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले सन्मान २०२३” हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुभाष इंद्रभान लोणकर उपस्थित होते.

यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र तुळशीराम टिळेकर, श्री दत्तसेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष दगडू टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष रोहिदास टिळेकर, पोलीस पाटील विजय टिळेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी अध्यक्ष सुभाष टिळेकर, उरुळी कांचन पतसंस्थेचे संचालक आबासाहेब टिळेकर, चेअरमन राऊत डेअरी अशोक विठोबा राऊत, प्रगतशील शेतकरी आत्माराम हरिभाऊ टिळेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्तीताई कांचन, जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई सुभाष जगताप, पंचायत समितीच्या मा.उपसभापती हेमलता बाळासाहेब बडेकर, अस्मिता पतसंस्थेच्या चेअरमन प्रतिभाताई महादेव कांचन, सरपंच मीनाक्षी चांगदेव म्हेत्रे, मा.सरपंच प्रियंकाताई सुदर्शन चौधरी, सरपंच कविता बाळासाहेब कोळपे, सरपंच उत्कर्षा नितीन गोते, सरपंच अश्विनी नवनाथ कोतवाल, उपसरपंच नंदा जगन्नाथ राऊत, ग्रामपंचायत टिळेकरवाडी सदस्य गणेश निवृत्ती टिळेकर, गोवर्धन सुरेश टिळेकर, सुशील अशोक राऊत, सुषमा सुभाष टिळेकर, कल्पना श्रीकांत टिळेकर, वैशाली भानुदास चौरे, प्रियंका रोहन कांबळे, ग्रामसेवक स्वाती राजगुरू आदि मान्यवर आणि गावातील सर्व महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर पाहुणे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले व ग्रामपंचायत सदस्य सुषमा सुभाष टिळेकर यांच्याकडून आभार प्रदर्शन करण्यात आले.

Previous articleराष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
Next article‘एलिव्हेटेड रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत टोल वसुली नको ; नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची स्पष्ट भूमिका