राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

उरुळी कांचन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन (ता.हवेली) राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक २८ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ या कालावधीत भवरापूर (ता-हवेली) येथे करण्यात आले होते. रा.से. यो.स्वयंसेवकांनी प्रथम मंदिर परिसर व शाळा परिसर स्वच्छ केला त्या नंतर कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. श्रमसंस्कार शिबिराच्या दुसऱ्या दिवशी स्वयंसेवकांनी भवरापूर ते स्मशानाभूमी लगत वृक्षारोपण केले त्यामध्ये मोरपंखी आणि पाम झाडांचे वृक्षारोपण झाले. दुपारच्या सत्रामध्ये “साक्षरता काळाची गरज” या विषयावर व्याख्यान झाले.

श्रमसंस्कार शिबिराच्या तिसऱ्या दिवशी स्वयंसेवकांनी जि. प. प्राथमिक शाळा भवरापूर ते ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत ब्लॉक बसविण्यासाठी रास्ता सपाटीकरण करण्यात आले तसेच जवळ वृक्षारोपण केले. दुपारच्या सत्रात “युवकांचा ध्यास ग्राम विकास” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. श्रमसंस्कार शिबिराच्या चौथ्या दिवशी जि. प. प्राथमिक शाळा ते चिंचबन पर्यंत वृक्षारोपण करण्यात आले व दुपारच्या सत्रामध्ये “नव-मतदार जाणीव जागृती व नोंदणी” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले तसेच सर्व स्वयंसेवकांनी ग्राम सर्वेक्षण केले. शिबिराच्या पाचव्या दिवशी स्वयंसेवकाने वृक्षारोपण केले तसेच रस्त्यालगत सपाटीकरण केले व वृक्षारोपण करण्यात आले. दुपारच्या सत्रात “महाविद्यालयीन युवकांचे आरोग्य एकाग्रता आणि बालविवाह” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले श्रमसंस्कार शिबिराच्या सहाव्या दिवशी स्वयंसेवकांनी आणखी वृक्षारोपण करून लावलेली झाडे जगवण्यासाठी ठिबक सिंचन करण्यास मदत केली दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना एम.पी. एस. सी. च्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी या विषयाचे व्याख्यान प्राप्त झाले श्रमसंस्कार शिबिरामध्ये स्वयंसेवकांनीजवळपास ५०० झाडांचे वृषारोपण केले.

शिबिराच्या सातव्या दिवशी या शिबिराचा समारोप करण्यात आला या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी सर्वोदय संघाचे खजिनदार व विश्वस्त राजाराम कांचन, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष सोन्याबापू चौधरी लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले. तसेच या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ बाळासाहेब भगत लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व पटवून दिले तसेच त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक देखील केले. या कार्यक्रमास भवरापूर गावचे विद्यमान सरपंच सचिन हरिभाऊ सातव उपस्थित होते. तसेच माजी पंचायत समितीचे सदस्य धनंजय साठे, माजी सरपंच बबनराव साठे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कामाचा आढावा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आधिकारी प्रा. मुंढे रविंद्र यांनी मांडला.

स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण झाले. व त्या नंतर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कमरून्नीसा शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बोत्रे यांनी केले. प्रा.बंडू उगाडे, शारीरिक शिक्षण संचालक करण जैन, प्रा. रोहित बारवकर, डॉ.समिर आबनावे, प्रा. विजय कानकाटे, प्रा.भाऊसाहेब तोरवे, प्रा.जी.एन. कुलकर्णी, प्रा.सारिका ढोनगे, प्रा.श्रेया चाव्हण, प्रा.अर्चना कुदळे, प्रा.प्रदिप ढवळे कार्यालयीन अधीक्षक प्रदिप राजपूत तसेच कार्यालयीन कर्मचारी मोरेश्वर बगाडे या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleवीज उद्योगातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंत्राटी कामगारांना कायम नोकरी सामावून घेण्याकरिता योजना बनविणार ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Next article“क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले सन्मान २०२३” पुरस्कार देऊन सन्मान : टिळेकरवाडी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम