कोरोना काळात काम केलेल्या कोरोना योद्धांना नोकरीत कायम करा:भारतीय मजदूर संघाची लेबर आॅफीस पुणे येथे निदर्शने

कुरकुंभ: प्रतिनिधी, सुरेश बागल

कोरोना, लाॅकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा समाजाची गरज, आवश्यकता म्हणून चालू होत्या. या कालावधीत आरोग्य विभागाने अत्यंत महत्त्वाचे योगदान देवुन कोव्हीड महामारी मध्ये औषध उपचार, कोव्हीड सेंटर, मनपा, जिल्हा परिषद दवाखाने, आरोग्य केंद्रात डाॅटर, नर्स, लॅबोरेटरीमध्ये, लसीकरण केंद्र, चतुर्थ श्रेणी कामगार, सुरक्षा रक्षक ई यांनी कोव्हीड मारामारी वर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटा ऊचलला आहे.

या कामगारांना मनपा मध्ये कायम नोकरीत समाविष्ट करण्यासाठी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने कामगारांचे लक्षवेधी आंदोलन मा अप्पर कामगार आयुक्त पुणे वाकडेवाडी येथे करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व आरोग्य मिशन संघांचे अध्यक्ष श्री. दिपक कुलकर्णी शासनाने प्रशासनाने कोरोना योद्धा ना कायम नोकरीत समाविष्ट करण्यासाठी शासकीय, प्रशासन पातळीवर वारंवार पाठपुरावा केला आहे पण शासनाने अद्याप पर्यंत या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही या मुळे कोरोना योद्धानी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने दि.२१ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रालय मुंबई येथे भव्य मोर्चा चे आयोजन केले आहे या मोर्चा मध्ये सहभागी होवून कामगारांच्या न्याय , हक्कांच्या मागण्या करिता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे.

महत्वपूर्ण मागण्या –
१) मनपा मुख्य सभा ठराव प्रमाणे सेवेत समावेश करा
२)नोकरी काळातील प्रलंबित बोनस फरक द्या
संघटनेने या बाबतीत मा कामगार उपायुक्त पुणे यांच्या कडे तक्रारी दाखल केल्या आहेत या सुनावणी मध्ये लेबर आॅफीस पुणे येथे सुनावणीसाठी पुणे महापालिकेचे जबाबदार आधिकारी हेतूपुरस्पर कोणीही येत नाही ,टाळाटाळ करत असल्यानेच कामगारांच्या मनात रोष निर्माण झाला असून
हजारोच्या संख्येने मुंबई मोर्चा मध्ये सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या बाबतीत संघटनेने महाराष्ट्र राज्य मा. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री , मा. आरोग्य मंत्री यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघ यांनी मागणी पत्र व्दारे कळविले आहे.
गेट मीटिंग मध्ये अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस श्री. सचिन मेंगाळे ,कामगार संघ, संघटनेचे अध्यक्ष श्री. दीपक कुलकर्णी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोना योद्धा कामगार प्रतिनिधी सौ.जयश्री रगडे, नुरानी शेख, उज्वला वाबळे, वर्षा मोरे, रोहित केंडे व मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. सर्व कामगार यांनी २१ डिसेंबर मुंबई येथील मोर्चा मध्ये सहभागी होणार आहेत.

Previous articleकिमान वेतनच्या अंमलबजावणी करिता बिडी कामगारांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा
Next articleसंस्कार स्कुल दौंडमध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न