किमान वेतनच्या अंमलबजावणी करिता बिडी कामगारांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा

कुरकुंभ : प्रतिनिधी ,सुरेश बागल

महाराष्ट्र राज्य व पुणे मधील वेगवेगळ्या ब्रँड चे १७ /१८ कारखाने कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे २ लाख ५० हजार कामगार कार्यरत आहेत. या कामगारांचे मुख्य काम म्हणजे घरखेप व कंपनीत बिडी वळण्याचे काम आहे यामध्ये बहुतांश महिला कामगार कार्यरत आहेत. असे असतानाही महाराष्ट्र राज्य सरकार ने २०१४ साली प्रति दिन प्रति हजार बिडी संघ रू. 332 रू. घोषित केले होते परंतु, कारखानदारांनी याची अंमलबजावणी केली नाही .या बाबतीत संघटनेने राज्य सरकार, कामगार आयुक्त महाराष्ट्र कार्यालय, जिल्हा कार्यालयात वारंवारं पाठपुरावा, आंदोलन करूनही याची दखल घेतली नाही. यांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बिडी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने घसेटी पुलं भवानी पेठ ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे मोर्चा व्दारे, निदर्शने केली.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस ऊमेश विस्वाद संबंधीत करताना अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य ,शिक्षण, प्रवास व ईतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने गोरगरीब बिडी कामगारांचे जीवन जगणे अत्यंत अवघड झाले आहे. सध्या बिडी कामगारांना प्रति माहे रू २८०० ते रू ५२०० येवढेच वेतन मिळते आहे ,यामध्ये किमान गरजाही पुर्ण करणे जिकिरीचे झाले आहे. बिडी कामगार आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, मालक समावेत सौदेबाजी, न्यायालयात जाणे, याची ताकद नाही यामुळे बिडी कामगार भारतीय मजदूर संघाच्या दि .२१ डिसेंबर २०२२ रोजी मुंबईत होणार्या मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात सामील होण्याचे आवाहन विस्वाद यांनी कलेक्टर आॅफीस समोर झालेल्या सभेत दिले आहे.

या वेळी संघटनेने निवेदन गृह शाखा मधील वरिष्ठ अधिकारी श्री .पिरजाते यांनी स्विकारले आहे यावेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे बिडी कामगार प्रतिनिधी वासंती तुम्मा, सुवर्णा नराल, लक्ष्मी वल्लाळ, बेबी राणी डे , श्रीमती नल्ला यांनी नेतृत्व केले व शिष्टमंडळात सहभागी होते .

Previous articleऊरळी कांचन चौकात पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे – रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडी — सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे
Next articleकोरोना काळात काम केलेल्या कोरोना योद्धांना नोकरीत कायम करा:भारतीय मजदूर संघाची लेबर आॅफीस पुणे येथे निदर्शने