शोगन केमिकल कंपनीत तीव्र स्फोट

कुरकुंभ , सुरेश बागल

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शोगन केमिकल कंपनीमध्ये मंगळवार ( दि.८)रोजी मोठा तीव्र रिऍक्टरचा स्फोट होऊन आगीचे लोट दिसू लागले आणि  मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती. अचानक  स्फोट होऊन आग लागल्यामुळे तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.  आणि त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले होते. साधारण विशेष प्रयत्नानंतर ४० मिनिटानंतर ही आग आटोक्यात आली. यामध्ये कंपनीचे देखील आर्थिक नुकसान झालेले आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील स्लोगन ही मच्छर प्रतिबंधक व अन्य रासायनिक केमिकल बनवणाऱ्या कंपनीत अचानक आग लागली. तांत्रिक अडचणीमुळे अचानक आग लागल्यामुळे यामध्ये कंपनीचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे . यावेळी तेथे किती कामगार काम करत आहेत याची अद्याप माहिती मिळालेली नाही परंतु सूत्रांच्या माहितीनुसार आगीमध्ये तीन कामगार जखमी झालेले आहेत व त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळालेली आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत अशा वारंवार घटना घडत आहेत. कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. अशा घटनांमुळे मानवी हानी होत आहे. याकडे प्रशासनाची दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न स्थानिक नागरिकांना  पडत आहे.

Previous articleभजन सम्राट अनुप जलोटा आणि प्रसिद्ध युवा गायक श्रीवल्लीफेम जावेद अली यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा १४ वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार जाहीर
Next articleउरुळी कांचन – महात्मा गांधी विद्यालयात १४ वर्षानंतर पुन्हा भरली आठवणींची शाळा