वडगाव निंबाळकर येथील १० महिन्यापूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून ; चार आरोपी अटकेत

उरुळी कांचन

वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील बेपत्ता झालेल्या पतीचा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा प्रकार आठ महिन्यानंतर उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

रोहित दत्तात्रय खोमणे (रा.- वडगाव उमाजी नाईक चौक, वडगाव निंबाळकर, ता. बारामती), वृषाली वैभव यादव वय-२३ वर्षे, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती), शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सूर्यवंशी वय २३, रा. वडगाव तुकाई माता चौक, ता. बारामत), सागर सर्जेराव चव्हाण वय-२७, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. तर वैभव विठ्ठल यादव (वय-३१. रा. सदर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली वैभव यादव यांनी पती वैभव यादव हे फेब्रुवारी महिन्यात बेपत्ता झाल्याची तक्रार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिली होती. सदर घटनेचा तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी पथकाला दिल्या होत्या. घटनेचा तपास करीत असताना वैभव यादव याची पत्नी वृषाली हिचे वडगाव निंबाळकर येथील रोहीत दत्तात्रय खोमणे याचे सोबत अनैतिक संबंध असल्याने पत्नी वृषाली हिनेच मित्र रोहित व त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने पती वैभव याचा खून केला असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शोध पथकाने वडगाव निबाळकर येथील एसटी स्टँड परिसरात सापळा रचून रोहीत यास ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचेकडे मिसिंगचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता वैभव यादव यास मारहाण करून पाडेगाव येथील कॅनॉल मध्ये फेकून दिल्याची कबुली दिली आहे. प्रियकराने तिच्या पतीचा खून केल्याची कबुली दिली आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या या खून प्रकरणामुळे वडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आरोपींना देण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक .शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, राजु मोमीन, विजय कांचन, अजय घुले, पोलीस नाईक धिरज जाधव तसेच निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस नाईक हिरामण खोमणे, पोपट नाळे, अमोल भुजबळ यांनी केली आहे.

Previous articleतळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांला सुरुवात : खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश
Next articleलोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन