लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन

उरुळी कांचन

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालय व तलाठी कार्यालय उरुळी कांचन यांच्या सहभागातून एकता दौडचे आयोजन विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, पर्यवेक्षक भागवत जाधव, तांत्रिक अधीक्षक अजय पाटील , पर्यवेक्षिका प्रतिभा हरिभक्त, उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद, तलाठी सुधीर जयभाई, प्रदीप जवळकर, निवृत्ती गवारे, कोतवाल रामलिंग भोसले, योगेश पवार, व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाच्या शालेय मैदानातून एकात्मता दौडला सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभागी होऊन उरुळी कांचन बाजारपेठ व आश्रम रोडवरून एकात्मतेचा संदेश देण्यात येत होते. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करून शाळेच्या प्रांगणात दौडची सांगता करण्यात आली. दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याला उजाळा देत अखंड भारतासाठी पटेल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली

Previous articleवडगाव निंबाळकर येथील १० महिन्यापूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून ; चार आरोपी अटकेत
Next articleमहात्मा गांधी विद्यालयाच्या २००४-२००५ च्या इयत्ता १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा भरला भव्यदिव्य स्नेह मेळावा ; तब्बल १७ वर्षांनंतर मिळाला जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा