हवेली तालुका पत्रकार संघाचा आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम : सभासदांना दिपावलीच्या निमित मिठाई वाटप

उरुळी कांचन

हवेली तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सभासद बांधवांना मिठाई वाटप करण्यात आले. पुणे प्राईम न्युज साप्ताहिकचे संपादक जनार्दन दांडगे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी जेष्ठ सल्लागार प्रभाकर क्षिरसागर, जेष्ठ मार्गदर्शन तुळशीराम घुसाळकर, संदिप बोडके, जयदिप जाधव, सचिन माथेफोड, जितेंद्र आव्हाळे, सुखदेव भोरडे, अमोल आढागळे, चंद्रकांत दुडे, सचिन सुबे, भाऊसाहेब महाडिक, विजय काळभोर, राजेश धिवार, विजय तुपे, पप्पू चिकणे, विशाल कदम, सुनिल तुपे, श्रीनिवास पाटील, तुकाराम गोडसे, सुधिर कांबळे, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी हवेली तालुका पत्रकार संघाचे सभासद कै.धनराज साळुंखे यांचे निधन झाले. तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप यांच्या वडिलांचे निधन व जेष्ठ सल्लागार प्रभाकर क्षीरसागर यांच्या बंधूचे निधन झाले असल्याने तालुका पत्रकार संघाच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर हवेली तालुका पत्रकार संघाच्या पुढील वाटचाल संदर्भात स्विस्तर चर्चा करण्यात आली धेय्य धोरण.

Previous articleकुरियर कंपनीच्या २४ लाखांची जबरी चोरी करून पळून गेलेली टोळी अखेर जेरबंद
Next articleखानवडी येथे १५ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन