कुरियर कंपनीच्या २४ लाखांची जबरी चोरी करून पळून गेलेली टोळी अखेर जेरबंद

उरुळी कांचन

यवत पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम खाजगी कंपनीचे कुरियर घेऊन पुणे कडे एस टी बस ने प्रवास करीत होता दि.६.१०. २०२२ रोजी. सदर इसमावर काही लोकांनी पाळत ठेवत एस टी मध्ये सहप्रवासी म्हणून बसले . गाडी यवत येथे येताच २ संशयित इसम उठून सदरील कुरियर बॉय ला तु मुलींना का छेडतो असे ओरडून त्याला मारहाण करीत त्याचे ताब्यात असलेले कुरियर ची बॅग घेऊन गेले. सदर कुरियर बॉय याने यवत पोलीस स्टेशन ला त्या अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दिली. सदर बॅग मध्ये रोख रक्कम २४ लाख रु असल्याचे कुरियर कंपनीचे मालक यांनी पोलिसांना सांगितले. सदरील गुन्हा यवत पोलीस स्टेशन गु र न ८२४/२०२२ भा द वि का कलम ३९२, ३४ नुसार नोंदवण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास करिता स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ठ पथक नेमण्यात आले होते.
सलगच्या १५ दिवस केलेल्या तपासात अखेर स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले . त्यानुसार आज दि २४/१०/२०२२ रोजी खालील प्रमाणे संशयित इसम ताब्यात घेतले. ओंकार दिनकर जाधव वय २४वर्षे रा अकोळनेर ता नगर जि अहमदनगर , अनिकेत गोरख उकांडे वय २३ वर्षे रा अकोळनेर ता नगर जि अहमदनगर, किरण रामदास गदादे वय २३ वर्षे रा तांदळी ता शिरूर जि पुणे, तेजस मोहन दुर्गे वय २० वर्षे रा म्हाडा कॉलनी बारामती ता बारामती जि पुणे, गणेश बाळासो कोळेकर वय २० वर्षे रा तावरे वस्ती सांगवी ता बारामती जि पुणे सदरील गुन्हा त्यांचा आणखी एक साथीदार नामे प्रेमराज उत्तम ढमढेरे रा तांदळी ता शिरूर जि पुणे याच्या मदतीने केला असल्याचे सांगितले.

वरील क्र १ ते ५ आरोपी ताब्यात घेतले असून प्रेमराज उत्तम ढमढेरे रा तांदळी ता शिरूर जि पुणे हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला आहे. सदरील १ ते ५ आरोपी यांना पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहेत.

सदरील कारवाई ही पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो स ई शिवाजी ननवरे, पो हवा सचिन घाडगे, पो हवा विजय कांचन, पो हवा अजित भुजबळ, पो हवा अजय घुले, पो हवा राजू मोमीन, पो हवा दत्तात्रय तांबे, पो ना बाळासाहेब खडके, पो कॉ धिरज जाधव, पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.

Previous articleअर्थसंपदा पतसंस्थेकडून निराधार कुटुंबांना किराणा वाटप
Next articleहवेली तालुका पत्रकार संघाचा आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम : सभासदांना दिपावलीच्या निमित मिठाई वाटप