रस्त्याच्या मध्यभागी गुडघाभर खड्डे असल्याकारणाने मानवी जीवन धोक्यात – सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेञे

कुरकुंभ : सुरेश बागल

दौंड तालुक्यातील कासुडी॔ टोलनाका ते सहजपूर फाटा पर्यंतच्या हायवेवरील रस्त्यावर भरपूर प्रमाणात त्रुटी आहेत ठेकेदाराने २ महिने झाले काम घेतलेले आहे तरीही साईडपटयावर माती साचलेल्या अवस्थेत आहे, लोखंडी जाळ्या वाकड्या आहेत, रस्त्यावर मध्यभागी गुडघाभर खड्डे पडलेले आहेत.

जावजुबुबाची वाडी येथे पोलिस पाटील आदरणीय तुकारामभाऊ कोडीतकर यांच्या घराजवळ भरपूर मोठा खड्डा पडला आहे .तरीही त्याठिकाणी रोजच अपघात घडत आहेत कालच पोलिस पाटील तुकारामभाऊ, अध्यक्ष मयुरशेठ आखाडे,भाऊ कोडीतकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे उपस्थित असताना रस्त्यावरील साईडपटया वरील माती कोडीतकर यांच्या जेसीबीच्या साहाय्याने काढीत असतानाच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे टु व्हीलर गाडीवाला रस्त्यावर मध्यभागी पडला सुदैवाने मागे कोणतीही गाडी नव्हती तसेच टु व्हीलर गाडीवालयाने हेल्मेट घातले असल्याने मुका मार तसेच किरकोळ जखमी झाले होते तुकाराम , मयुर व मी जखमींना रुग्णालयात जाण्यासाठी मदत केली होती तरीही रस्त्यांचे काम घेतलेल्या ठेकेदाराने विनंती करतो की कासुडी॔ टोलनाका ते कवडीपाट टोलनाक्यापर्यंत रस्त्यावरील गुडघाभर खड्डे,साईडपटया वरील माती, तुटलेल्या लोखंडी जाळ्या, चौकातील तुटलेले सिग्नल खांब लवकरात लवकर काढून टाकावित या रस्त्यांवरील नागरिक ठेकेदारांच्या व अधिकारी लोकांवर भरपूर संतापलेल्या अवस्थेत आहेत . किती लोकांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे .तरीही लवकरात लवकर खड्डे, साईडपटया डांबर खडी टाकून बुजविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी प्रशासनाला नम्र विनंती करतो. तसेच ठेकेदाराने दुर्लक्ष केले तर, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे हे आंदोलन करणार आहेत असे तीव्र शब्दात त्यांनी प्रशासनाला सांगितले.

Previous articleकोविड काळात कर्तव्यावर असतांना शहीद झालेल्या प्रकाशदुतांचे स्मरण
Next articleकोविड काळात , अपघातात कर्तव्यावर असतांना शहीद झालेल्या प्रकाश दुतांचे पणत्या लावून स्मरण