महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्यपालांची भेट घेऊन दिले अधिवेशनाचे निमंत्रण

कुरकुंभ, सुरेश बागल

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाचे ५ वे त्रैवार्षिक अधिवेशन ८ व ९ ऑक्टोबर २०२२ रोजी स्मृतीभवन, रेशीमबाग, नागपूर येथे होत असल्याचे पार्श्वभूमीवर (दि‌.१८)रोजी भारतीय मजदूर संघाच्या ठेका मजदूर महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी वीरेंद्र कुमार, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार,आणि भारतीय मजदुर संघाचे कार्यकर्ते निलेश गाडगे या शिष्टमंडळाने पुणे येथील राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंग कोथारी यांची भेट घेतली.

संघटनेच्या वतीने राज्यपालाचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. तसेच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या अधिवेशनाची निमंत्रण पत्रिका त्यांना दिली.

संघटनेचे वतीने राज्यभरातील आर्थिक दृष्ट्या शोषित पीडित वीज कंत्राटी कामगारांसाठी संघटनेच्या माध्यमातून चालु असलेल्या कार्याची तसेच संघटनेच्या डिझीटल कामकाजाची तसेच या कामगारांना संघटनेने न्याय मिळवून दिलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली तसेच कंत्राटी कामगारांच्या अधिवेशनात कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती केली आहे.

भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या या ऐतिहासिक अधिवेशना मध्ये सहभागी होण्यासाठी मला हि एक संधी मिळत आहे आणि नागपूरच्या रेशीमबाग येथे हे अधिवेशन असल्याने माझी उत्सुकता वाढली असून मी नागपूर अधिवेशनाला येण्याचा १००% प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मा. राज्यपाल महोदय यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास दिल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा उल्हास द्विगुणित झाला आहे असे संघटनेचे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी कळविले आहे.

Previous articleपंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शेतकऱ्याची आत्महत्या
Next articleवीज ऊद्योगातील कंत्राटी कामगार उतरणार रस्त्यावर