सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हलचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

उरुळी कांचन

सोरतापवाडी परिसरातील सुदर्शन चौधरी यांचे कुटुंबातील अनेक सदस्यांनी गावाचे नेतृत्व केले आहे. तोच समाजकारणाचा वसा आणि वारसा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी पुढे चालवत आहे. सोरतापवाडी हे गाव फुलांच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. या भागातील ज्या काही समस्या मांडल्या आहेत त्या निश्चितच सोडण्यास प्राधान्य देणार असल्याचे मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हलच्या उदघाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन.

यावेळी आमदार राहुल कुल, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदिप कंद, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदास उंद्रे, तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, मा.सरपंच प्रियंका सुदर्शन चौधरी, प्रविण काळभोर, राहुल पाचार्णे, गणेश कुटे, महादेव कांचन, गणेश चौधरी, सुहास चौधरी, पुजा थिगळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous article‘पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ‘कला उत्सवाचे’ आयोजन
Next articleनारायणगाव शाखेमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा