‘पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त ‘कला उत्सवाचे’ आयोजन

उरुळी कांचन

उरुळी कांचन येथील ‘पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘कला उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश अडसूळ यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ.रमेश अडसूळ म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कला व गुणांना वाव मिळावा व भविष्यात यातूनच व्यावसायिक निर्माण व्हावेत असे मार्गदर्शन केले. या स्पर्धेत एकूण ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत स्पर्धेच्या समन्वयक प्रा. शुभांगी रानवडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अमोल बोत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप्रिता भोर यांनी केले.

या कार्यक्रमास IQAC समन्वयक प्रा.नंदकिशोर मेटे , वाणिज्य विभाग प्रमुख सुजाता गायकवाड, प्रा.विजय कानकाटे, प्रा.नवनाथ कांचन उपस्थित होते. कार्यक्रमाला पुढील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले प्रा.रोहित बारवकर, प्रा.संतोष पवार, प्रा. अनुजा झाटे, प्रा. स्वाती मासाळकर, प्रा.सारिका डोणगे, प्रा.दिपाली चौधरी, प्रा.नंदिनी सोनवणे, प्रा.निलजा देशमुख, प्रा. रोहिणी शिंदे, प्रा.अंजली शिंदे, प्रा.कमरुन्निसा शेख, प्रा. आप्पासाहेब जगदाळे, प्रा. भाऊसो तोरवे उपस्थित होते.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे परीक्षण डॉ.समीर आबनावे, प्रा.वैशाली चौधरी, ग्रंथपाल प्रा.सौरभ साबळे यांनी केले. या उपक्रमात प्रदीप राजपूत, विशाल महाडिक व प्राध्यापक वर्ग, व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous article19 व 20 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे अधिवेशन नक्की: मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांची ग्वाही
Next articleसोरतापवाडी गणेश फेस्टिव्हलचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन