नारायणगाव शाखेमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नारायणगाव : (किरण वाजगे)

पुणे जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०५ वा वर्धापन दिन जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. नारायणगाव शाखेत देखील आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणामध्ये बँकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

बँकेचा वर्धापन दिन साजरा करत असताना नारायणगाव शाखेच्या परिसरातील प्रगतशील शेतकरी राहुल बनकर, नितीन भोर, प्रकाश माने, चंद्रकांत बनकर, अशोक पाटे,सचिन पवार, बबन खैरे, पंकज पाटे, सचिन शेलोत, विघ्नहर सह साखर कारखान्याचे तज्ञ संचालक धनेश पडवळ, नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन व सदस्य आणि सभासद तसेच सचिव गणेश गाडेकर उपस्थित होते.

यावेळी नारायणगाव शाखेच्या शाखाप्रमुख जयमाला काळे यांनी मा. संचालक संजयराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची आजपर्यंतची वाटचाल आणि ग्राहकांसाठी राबवलेल्या विविध योजना व मोबाईल बँकिंग एप्लिकेशन्स सह इतर माहिती उपस्थितांना दिली.

या वर्धापन दिनाचे आयोजन झोनल ऑफिसर बाळासाहेब मुरादे, सुभाषराव कवडे, वसुली अधिकारी सुनील ताजणे, विकास अधिकारी प्रसाद कोल्हे यांच्या सह नारायणगाव शाखेतील सेवक वृंद यांनी केले.

Previous articleसोरतापवाडी गणेश फेस्टिव्हलचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन
Next articleनारायणगाव महाविद्यालयाची गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात: डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई